Home अहमदनगर दुचाकीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्याने शहरात खळबळ

दुचाकीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्याने शहरात खळबळ

Ahmednagar | Rahuri News: मोटरसायकल प्लगचा सप्लाय तसेच सायलेन्सरला आर्थंग देऊन जिलेटीनच्या कांड्या जोडण्यात आल्याचे दिसून आले.

after gelatin explosive sticks were found in the bike

राहुरी: मुळा शेतकऱ्याच्या मोटरसायकलला जिलेटीनच्या कांड्या जोडण्याच्या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली. हा प्रकार घातपातासाठी ? या चर्चेला उधाण आले. राहुरीच्या मुळा धरणाच्या पायथ्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना उघडकीस आली.

बारागाव नांदूर येथील बाळासाहेब मंडलिक हे शुक्रवारी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे धरणाच्या पायथ्याजवळील शेतीवर गेले होते. शेतीचे कामे आटोपून साडेचार वाजता आपली एमएच १७ एसी ७४६९ मोटरसायकलवर धरणाच्या पुलावरून घरी जात असताना

काही अंतरावर मोटरसायकल बंद पडल्याने मंडलिक यांनी थांबून पाहणी केली. यावेळी मोटरसायकल प्लगचा सप्लाय तसेच सायलेन्सरला आर्थंग देऊन जिलेटीनच्या कांड्या जोडण्यात आल्याचे दिसून आले. मंडलिक यांनी क्षणाचा विलंब न करता जिलेटीन कांड्याला जोडलेल्या वायर तोडून टाकल्या. या घटनेबाबत मंडलिक यांनी बारागाव नांदूर येथील तंटामुक्त अध्यक्ष शिवाजीराव पवार यांना दिल्याने घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे तसेच पोलिस पथकाने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या घटनेबाबत काही सुगावा लागला नाही.

Web Title: after gelatin explosive sticks were found in the bike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here