Home क्राईम पतीच्या ‘त्या’ कृत्यावर निराश झालेल्या पत्नीने केली आत्महत्या- Suicide

पतीच्या ‘त्या’ कृत्यावर निराश झालेल्या पत्नीने केली आत्महत्या- Suicide

Sangali Suicide News:  नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन पत्नीने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

Frustrated by her husband's actions, the wife committed suicide

सांगली: पतीने मोबाईलचे लॉक उघडून न दिल्याने निराश झालेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरटे येथे ही धक्कादायक घटना घडली. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात शिवाजी खोत यांनी फिर्याद दिली आहे.

शिरटे येथे सामान्य कुटुंबातील भगवान खोत हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अल्प शेती असल्याने भगवान खोत साखर कारखान्यात नोकरी आणि शेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. काल सकाळी भगवान यांचा मोबाइल पत्नीने घेतला. त्याचा लॉक काढून द्या असा हट्ट पत्नी भगवान यांच्याकडे करू लागली.

परंतु भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाइल लॉक काढून दिला नाही त्यामुळे पत्नी निराश झाली आणि चहा नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन पत्नीने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Frustrated by her husband’s actions, the wife committed suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here