Home पुणे अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीची महिलेला धमकी, महिलेची पुन्हा….

अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीची महिलेला धमकी, महिलेची पुन्हा….

Rape Case:  महिलेला आरोपींनी वारंवार पाठलाग करीत गुन्हे (abused) मागे घेण्याची धमकी दिल्याची घटना.

accused threatened the woman to withdraw the crime of abused

पुणे: पुण्यात अत्याचार महिलेला आरोपींनी वारंवार पाठलाग करीत गुन्हे मागे घेण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी पिडीत महिलेला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला वैतागून ४२ वर्षीय पिडीतेने पुन्हा एकदा पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी तीस वर्षीय नासीर सलाम सौदागर याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने नसीरविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्यात त्याला अटकही झाली होती. सध्या या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मात्र आरोपी पीडितेचा छळ करतो आहे. तिला अर्वाच्च भाषेत बोलत आहे, तिच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करीत आहे.  असा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी वैतागला होता. नसीर गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग करत होता. तिला त्रास देत होता. तिला धमकावण्याचाही प्रयत्न त्याने बऱ्याचदा केला होता. मात्र ज्यावेळी त्याने अश्लील भाषा वापरत होता. त्यावेळी मात्र महिला वैतागली तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Web Title: accused threatened the woman to withdraw the crime of abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here