संगमनेर शेतकी संघाच्या संचालकाची गळफास घेवून आत्महत्या
Sangamner News: संगमनेर शेतकरी सहकारी संघाचे विद्यमान संचालक व निमगावटेंभी सोसायटीचे चेअरमन यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. (Ahmednagar News)
संगमनेर: संगमनेर शेतकरी सहकारी संघाचे विद्यमान संचालक व निमगावटेंभी सोसायटीचे चेअरमन दिलीप काशिनाथ वर्पे (वय 59) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप काशिनाथ वर्पे हे गुरुवारी सायंकाळी दूध घालण्यासाठी गेले होते. ते पुन्हा घरी आले नाही. त्यानंतर घरातील मंडळींनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही. शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांची आई शेतात गेली असता त्यांना मुलगा दिलीप वर्पे हे एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने घरातील इतर जण धावून गेले. घटनेची माहिती त्यांचा पुतण्या रवि भाऊसाहेब वर्पे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना दिली.
माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक शिरीष वमने, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड, सहाय्यक फौजदार सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल ढमाळे, पोलीस कॉन्स्टेबल उगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. ठसेतज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर वर्पे यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. उत्तरणीय तपासणी करीता त्यांचा मृतदेह प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आला. त्यांनी आत्महत्या केली का? त्यांचा कुणी घातपात केला? याचे अद्याप नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर ते समोर येईल अधिक तपास पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Director of Sangamneri Farmers Union committed suicide by hanging himself
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App