Home क्राईम संगमनेरात कॉलेजच्या गेट समोर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा

संगमनेरात कॉलेजच्या गेट समोर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा

Sangamner Crime News: श्रमिक ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला चौघांजणांनी बेदम मारहाण केल्याची घटना. विद्यार्थी जखमी.  चौघांवर गुन्हा दाखल.

student was brutally beaten in front of the college gate in Sangamnerat, a crime against four

संगमनेर: येथील श्रमिक ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला चौघांजणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कॉलेज गेट समोर घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विंद्र भूषण कोळी (वय 16, रा. विद्यानगर, संगमनेर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कॉलेज सुटल्यानंतर रविंद्र कोळी हा गेटवर उभा असतांना 11 वीतच शिकत असलेल्या एकाने रविंद्र याला चॉकलेटचा कागद फेकून मारला. हा कागद का फेकून मारला म्हणून रविंद्र याने विचारले असता त्या विद्यार्थ्याने हातातील लोखंडी कडे रविंद्र याच्या तोंडावर व हातावर मारुन गंभीर जखमी केले. त्यानंतर मारहाण करणार्‍या त्या विद्याथ्याचे तीन नातेवाईकांनी तेथे येवून रविंद्र यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

जखमी रविंद्र कोळी यास संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत भूषण भाईदास कोळी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील सायखिंडी परिसरात राहणार्‍या एका विद्यार्थ्यासह इतर तीन नातेवाईक अशा चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता 324, 323, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास डुंबरे हे करत आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण डोके वर काढीत आहे.

Web Title: student was brutally beaten in front of the college gate in Sangamnerat, a crime against four

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here