संगमनेरात बनावट सोने तारण ठेवून बँकेची 22 लाख रुपयांची फसवणूक, गोल्ड व्हॅल्यूअरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
Sangamner Crime News: बनावट सोने तारण ठेवून इंडियन ओव्हरसीज बँकेची 21 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस, गोल्ड व्हॅल्यूअरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल. (Ahmednagar News)
संगमनेर: बनावट सोने तारण ठेवून इंडियन ओव्हरसीज बँकेची 21 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत गोल्ड व्हॅल्यूअरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेचे शाखा शाखाधिकारी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोने मुल्यांकनकार जगदीश सुभाष म्हसे व चार सोने तारण कर्जदार यांनी संगनमताने पुर्वनियोजित कट करुन इंडियन ओव्हरसीज बँकेची 10 सोने तारण कर्ज प्रकरणात 21 लाख 91 हजार 677 रुपयांची फसवणूक केली. बनावट व खोटे सोने खरे असल्याचा बँकेस खोटा दाखला देवून बँकेची फसवणूक केली आहे. हा प्रकार दि. 6 ऑक्टोबर 2022 ते 21 मे 2023 दरम्यान घडला.
याबाबत इंडियन ओव्हरसीज बँकेचे शाखा शाखाधिकारी निवृत्ती नव्हाटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी जगदीश सुभाष म्हसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), उत्तम विश्वनाथ पानसरे (रा. वाघापूर, ता. संगमनेर), लहानू किसन नेहे (रा. नांदूर दुमाला ता. संगमनेर), मंगेश सपंत दिघे (रा. कोल्हेवाडी, ता. संगनमेर), जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. घुलेवाडी) या पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 467, 474, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Bank fraud of Rs 22 lakh by pledging fake gold in Sangamner Crime Filed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App