Home नंदुरबार तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या झाल्याचा अंदाज

तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या झाल्याचा अंदाज

discovery of the young woman's Dead body, presumably murder

नंदुरबार | Nandurbar Crime: धडगाव शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरील हरणखुरी व सोमाणा परिसरातील डोंगराळ भागात अज्ञातस्थळी २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह (Dead  Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर युवतीची दोन दिवसांपुर्वी हत्‍या झाल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कुंडल (ता. धडगाव) परिसरात २५ वर्षीय युवतीचा मृतदेह (Dead  Body) आढळून आला आहे. ललिता मोतीराम पाडवी असे सदर युवतीचे नाव  आहे. ती शिरपूर येथे कंपनीत कामास  असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर युवतीचा बलात्कार (rape) करून खून (Murder) झाला असल्याचा अंदाज असून डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा आहेत.

शिरपुरहून शहादामार्गे धडगाव येत असल्याचा फोन ललीता हिने आई– वडिलांना केला होता. यानंतर मात्र सदर युवतीचा मोबाईल फोन बंद येत होता. यामुळे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्‍या मुलीचा शोध आई- वडील करीत होते.

दरम्‍यान आज सदर युवतीचा मृतदेह आढळून आला. धडगाव पोलीस घटनास्थळी दाखल अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पाचशे मीटर अंतरावर ब‌ॅग कागदपत्रे व इतर सामान आढळून आल्याने मृतदेहाचा तपास लागला. धडगाव पोलिसांच्या मदतीने सदर युवतीचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अधिक तपास लागण्याची शक्यता आहे.

Web Title: discovery of the young woman’s Dead body, presumably murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here