Home अकोला वारी हनुमान येथे मामा भाच्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

वारी हनुमान येथे मामा भाच्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

Young man dies after drowning in uncle's niece's pond

अकोला | Akola: अकोल्यातील काही तरुण वारी हनुमान येथे दर्शनासाठी गेले असताना यातील काही मित्र मंदिराकडे होते. तर काही मामा भाच्याच्या डोहाकडे अंघोळ करण्यासाठी गेले असताना एका तरुणाचा डोहात बुडून (drowning) मृत्‍यू (Death) झाल्‍याची घटना घडली आहे.

गेल्या वर्षानुवर्षे सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मामा भाच्याच्या डोहात शेकडो जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. शासनाकडून तसेच नागरिकांकडून दक्षता घेण्यासाठी आवाहन करण्यात येते. मात्र यास न जुमानता काही तरुण अंघोळीसाठी जात असतात. अशीच घटना आज घडली असून अकोल्यातील युवक दर्शनासाठी वारी हनुमान येथे आले होते. यात मामा भाच्याच्या डोहाकडे अंघोळ करण्यासाठी गेले असता राज गुडदे (वय १९, रा. सिंधी कॅम्प अकोला) हा अंघोळ करीत असताना बुडाला. यावेळी  मित्रांनी आरडाओरड केली तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सदर युवक बुडाला होता.

याबाबत वारी येथील सरपंच शिवा पतींगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन याबाबत हिवरखेड पोलिसांना माहिती दिली. याबाबत अधिक तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.

Web Title: Young man dies after drowning in uncle’s niece’s pond

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here