Home अहमदनगर श्रीरामपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

श्रीरामपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

MNS activists arrested in Shrirampur

श्रीरामपूर | Shrirampur:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील आंदोलन करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहे. तर पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात येत आहे. मशिदींवरील भोंगे त्वरित हटविण्यात यावे यासाठी मनसेच्यावतीने श्रीरामपूरमध्ये आंदोलन करण्यात आले.

तसेच शहरातील सय्यद बाबा चौक येथील मशिदीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतले आहे.

Web Title: MNS activists arrested in Shrirampur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here