Home गडचिरोली मैत्रिणीला घेऊन एकांतात जंगलात फिरायला गेला अन घडले धक्कादायक

मैत्रिणीला घेऊन एकांतात जंगलात फिरायला गेला अन घडले धक्कादायक

forest with my girlfriend and it happened shockingly Tiger attack death

गडचिरोली | Gadchiroli: उसेगाव येथील जंगलात अजय नाकोडे चार चाकी वाहनाने मित्र मैत्रिणीस घेऊन गेला होता, अजयचा मित्र गाडीत बसून होता. हे दोघे जंगलात फिरायला गेले. जंगलात फिरताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक अजय नाकोडेवर हल्ला केला. मैत्रिणीने वाघाला हल्ल्यापासून दूर करण्यास प्रयत्न केले. मुलीवरही वाघाने दोन तीन वार करून जखमी केले. त्यानंतर पुन्हा अजयवर झडप घेत मोठा हल्ला केला. या हल्ल्यात अजय जागीच ठार (Death) झाला. हे सर्व थरारक घटना पाहून जखमी तरुणी जंगलाच्या बाहेर आरडाओरडा करत बाहेर निघाली तेव्हा स्थानिकांनी वाघाला काड्यांच्या सहाय्याने पळवून लावले मात्र तोपर्यंत अजयचा मृत्यू झाला होता.

जखमी झालेल्या मैत्रिणीला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. पोलीस विभागही घटनास्थळी दाखल झाले होते. अजयचे शव वन विभागाच्या कर्मचारी सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. प्रेमसंबधातील झालेली मुलाखत जीवावर बेतेल असं अजयला कळल नव्हत.

Web Title: forest with my girlfriend and it happened shockingly Tiger attack death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here