Home अहमदनगर Drowned: मुळा धरणात तरूणाचा बुडून मृत्यू

Drowned: मुळा धरणात तरूणाचा बुडून मृत्यू

Young man drowned in Mula dam

राहुरी  Rahuri:  मुळा धरणाच्या पाण्यात पोहोण्यासाठी गेलेल्या श्रीरामपूर येथील अविवाहित तरूणाचा बुडून मृत्यू (Drowned)  झाला झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी रमजान ईदच्या दिवशीच एका मुस्लिम युवकाचा मृत्यू झाल्याने श्रीरामपूरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी त्या तरूणाचा मृतदेह वर काढून राहुरी येथील खासगी रूग्णालयात नेला असता तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

मुळा धरण परिसरात चमेरी विश्रामगृहानजिक काही तरूण मुळा धरण बघण्यासाठी आले होते. श्रीरामपूरला दुपारी ईदची नमाज पठण केल्यानंतर ते मुळा धरणावर आले होते. विश्रामगृहाच्या पायथ्याशी काही तरूणांनी धरणात उडी मारली. त्यात एकजण बुडाला. त्याला अन्य तरूणांनी वाचविले. मात्र, दुसरा तरूण पाण्यात दिसेनासा झाला. त्याला शोधण्यासाठी तरूणांनी उड्या मारल्या. मात्र, त्यांना तो मिळून आला नाही. अखेर त्या ठिकाणी अशोक भोसले, गणेश पाटोळे, सागर दुधाडे, नितीन साळुंके, यांनी पाण्यात उड्या मारून बेपत्ता तरूणाचा शोध घेतला. काही प्रयत्नानंतर तो त्यांच्या हाती लागला. त्याला तातडीने राहुरी  येथील रूग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Young man drowned in Mula dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here