Home अकोले अकोले: राजूरच्या उरुसात दुष्काळामुळे बाजारात उलाढाल मंदावली

अकोले: राजूरच्या उरुसात दुष्काळामुळे बाजारात उलाढाल मंदावली

राजूर: दरवर्षीप्रमाणे प्रमाणे अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या शनिवारी आणि मंगळवारी ग्रामपंचायतीच्या वतीने चॉदशा पीरबाबाच्या उरुसाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र येथील उरुसावर दुष्काळाचे सावट दिसून आले. बैल खरेदी विक्री या उरुसाची खासियत आहे. मात्र या बाजारात खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या बैलजोड्यांची संख्याही घटली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वथता पसरली आहे.

या उरुसामध्ये पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या या बाजारात खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बैलजोड्या येत असतात्त. संगमनेर, मालेगाव, सटाणा, औरंगाबाद या आणि आदि ठिकाणाहून बैलजोड्या बाजारात येत असतात. मात्र यावर्षीचा उन्हाळा हा कडक असल्यामुळे त्याचबरोबर दुष्काळ, लग्नसराई असल्यामुळे बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. व्यापारी वर्गाची संख्या सुद्धा कमी दिसत होती. उन्हाच्या झळा अधिक असल्याने सकाळी अकरा ते पाच या वेळात बाजार, पाळणे गर्दी विनाच राहिले. दुष्काळी परिस्थिती असल्याने खरेदी विक्रीसाठी आलेल्या बैल जोड्यांचे ग्रामपंचायतीने शेतकर्यांकडून कोणतेही प्रकारची पावती आकारली नाही. एकंदरीतच या बाजारात दुष्काळी परीस्थितीचे सावट दिसून आले.

Website Title: Due to drought in Rajur urus 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here