Home महाराष्ट्र नरेंद्र मोदींना मानसिक पराभव मान्य: राज ठाकरे

नरेंद्र मोदींना मानसिक पराभव मान्य: राज ठाकरे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मात्र शुक्रवारी प्रचार कालावधी संपत आल्यानंतर पत्रकार परिषदेला पंतप्रधान आलेच कशाला? पक्ष अध्यक्ष अमित शहा पत्रकार परिषदेत बोलणार होते तर मोदी गेलेच का? त्यांनी मानसिक पराभव मान्य केला आहे असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीवर निशाना साधला आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी एवढे का घाबरतात? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये लोकांचे बोलणे ऐकण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची हिम्मतच उरलेली नाही. असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. मोदी पत्रकारांच्या प्रश्नाला का घाबरत्तात याचे उत्तरही त्यांनी पत्रकांना द्यावे अशीही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. ज्या पत्रकार परिषदेत मोदी नाहीत त्याबद्दल आपण न बोललेलेच बरे असेही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इतके दिवस दादागिरी केली. ती दादागिरीच त्यांना भोगावी लागणार आहे.असेही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Website Title: Narendra Modi accepting mental defeat Raj Thakare 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here