समशेरपूर: अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे सलग दोन दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला असून या परिसरातील कालवड व बैलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही जनावरे जागीच ठार झाले.
समशेरपूर येथे काल पहाटे चार वाजता लक्ष्मण पुंजा मोखरे यांचा बैल घराच्या पडवीत बांधला असताना काल मंगळवारी पहाटे तीन वाजता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बैलाचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर काल बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास रंजना अरुण जगताप यांची कालवड घराबाहेर बांधलेली असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. ही कालवडही जागीच ठार झाली. या दोनही जनावरांच्या वन विभागाच्या वतीने वनपाल गोल्हार, वनकर्मचारी महेश सदगीर, सुभाष आभाळे, रावसाहेब एखंडे यांनी पंचनामा केला.
समशेरपूर आणि परिसरात सध्या दुष्काळी परिस्थिती असून रान शिवारातील बिबट्या इतर पशु शिकारीसाठी गाव परिसरात पलायन करीत आहे.
Website Title: Akole Scorching bulls and wounds kill