Home नाशिक रस्त्याअभावी मृतदेह झोळीतून, प्रसूतिवेदना सहन करणाऱ्या महिलेचा मृत्यू

रस्त्याअभावी मृतदेह झोळीतून, प्रसूतिवेदना सहन करणाऱ्या महिलेचा मृत्यू

Nashik: प्रसूतिवेदना सहन करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर झोळी करून तिचा मृतदेह (Dead body) तीन किलोमीटरचा प्रवास करत घरी न्यावा लागल्याची धक्कादायक घटना.

Due to the lack of road, the dead body in the bag, the death of a woman suffering

 

इगतपुरी : शासन आपल्या दारी, रस्त्यांसाठी कोट्यवधींचा खर्च, गाव तेथे कॉक्रीट रस्ते अशा करणाऱ्या वल्गना प्रशासनाचे दावे फोल ठरत असल्याचे उघड झाले आहे. प्रसूतिवेदना सहन करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर झोळी करून तिचा मृतदेह तीन किलोमीटरचा प्रवास करत घरी न्यावा लागल्याची धक्कादायक घटना इगतपुरीत तालुक्यात घडली.

जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत या महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी पहाटे अडीच वाजता अडीच किमी पायी चालत घडलेली महिलेला तळोघ येथून घोटीला आणले. तिची प्रकृती खालावल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या दुर्दैवी घटनेत महिलेच्या पोटातील बाळाचाही दुर्दैवी अंत झाला.

रस्त्याची दुरवस्था, पायपीट यात झालेल्या विलंबामुळे महिलेला प्राण सोडावा लागल्याचा आरोप होत आहे. मृतदेह घरी नेण्यासाठी सुविधांअभावी मंगळवारी दुपारी मृतदेह झोळीतून घरी नेण्यात आला.

या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार हिरामण खोसकर यांनी अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या समस्यांचा प्रश्न उपस्थित केला. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाच्या दृष्टीने घटना लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया एल्गार संघटनेचे भगवान मधे यांनी व्यक्त

रस्त्याची मागणी

जुनवणेवाडीसारख्या अनेक गावात रस्ताच नाही. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाच्या दृष्टीने ही लाजिरवाणी घटना असून या गावात तातडीने रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सीताराम गावंडा यांनी केली आहे.

रस्ता नव्हे चिखल

तळोध ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे तीन किलोमीटरच्या अतिशय कच्च्या रस्त्याने यावे लागते. पावसामुळे रस्ता सध्या चिखलमय झाला आहे.

रस्ता एवढा कच्चा आहे की, पावसाळ्यात चालणेही मुश्कील होते. अशावेळी कुणाचे मरणसुद्धा या लोकांना परवडत नाही.

Web Title: Due to the lack of road, the dead body in the bag, the death of a woman suffering

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here