Home क्राईम संगमनेरात कॅफे हाऊसमध्ये अत्याचार, हॉटेल मालकासह तिघांना अटक

संगमनेरात कॅफे हाऊसमध्ये अत्याचार, हॉटेल मालकासह तिघांना अटक

Sangamner News: दहावीत शिकणार्‍या मुलीच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन संगमनेरात आणून एका कॅफे हाऊसमध्ये अत्याचार (abused).

Abused in cafe house in Sangamnerat, three arrested including the hotel owner

संगमनेर: दहावीच्या वर्गात शिकणार्‍या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला सहाय्य करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणात आणखी पाच आरोपींचा समावेश झाला आहे. तर त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पठारभागातील एका गावातील दहावीत शिकणार्‍या मुलीच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन आरोपी गणेश सुखदेव भडांगे याने तिला संगमनेरात आणून एका कॅफे हाऊसमध्ये तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर आरोपी गणेश भडांगे यास अटक केली.

दरम्यान भडांगे याने सदर मुलीला ज्या कॅफे हाऊसमध्ये आणले होते त्या कॅफे हाऊसचे चालक-मालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर गुन्ह्यात आरोपीला सहाय्य करणार्‍या स्वयं हेमंत पंधारे (वय 23, रा. सौभाग्य मंगल कार्यालय, मालदाड रोड, संगमनेर), प्रविण काशिनाथ कोठवळ (वय 27, रा. महालवाडी, ता. संगमनेर), मिलिंद भारत ताजणे (वय 34, रा. अकोले बायपास, संगमनेर) यासह आणखी दोघे अशा पाच जणांविरुद्ध कारवाई केली आहे. वरील तिघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील एम. पी. गवते यांनी बाजू मांडली. मुख्य आरोपीस सहाय्य करणार्‍यांकडून अधिक तपास करण्यासाठी त्यांना जामीन न देता पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती न्यायालयास करण्यात आली. त्यावर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. एच. अमेटा यांनी सदर आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Abused in cafe house in Sangamnerat, three arrested including the hotel owner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here