Home Accident News संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Sangamner news:  मालदाड फाटा येथे रस्ता ओलांडत असतांना भरधाव आलेल्या अज्ञात इसमाने जोराचे धडक (Accident) दिल्याने एका इसमाचा मृत्यू  झाल्याची घटना.

One killed in collision with unknown vehicle Accident

संगमनेर:  संगमनेर नाशिक-पुणे महामार्गावरील – घुलवाडी शिवारातील मालदाड फाटा येथे रस्ता ओलांडत असतांना भरधाव आलेल्या अज्ञात इसमाने जोराचे धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. अपघातानंतर सदर वाहन चालक मदत न करता घटना स्थळावरून पसार झाला. ही घटना शनिवार २२ रोजी रात्री ११.३० १.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात काल सोमवारी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबात माहिती अशी की, मयत कृष्णा दत्तात्रय जंत्रे (वय ४५, रा. श्रीरामनगर, संगमनेर) हे घुलेवाडी शिवारातील मालदाड फाटा जवळ रस्ता ओलांडत असतांना नाशिकच्या दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत जंत्रे हे गंभीर जखमी झाले. बराच वेळ ते जखमी अवस्थेत पडून होते. सदर वाहन चालकही फरार झाला होता. उशिरात त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या पत्नी अल्का कृष्णा जंत्रे यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One killed in collision with unknown vehicle Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here