Home अकोले मुळा ‘एवढे’ टक्के भरले तर भंडारदरा धरणातून विसर्ग वाढविला

मुळा ‘एवढे’ टक्के भरले तर भंडारदरा धरणातून विसर्ग वाढविला

Akole Dam Update:  मुळा धरण आज बुधवारी 55 टक्के भरणार.

Mula Dam So per cent, the discharge from Bhandardara dam is increased

अकोले:  अकोले, राहुरी, नगर शहर, तालुका, पाथर्डी, शेवगाव, नेवाशातील शेती, पिण्याचे पाणी तसेच नागापूर एमआयडीसीला वरदान ठरलेले मुळा धरण आज बुधवारी 55 टक्के भरणार आहे.

मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरात दिवसभर दमदार पाऊस सुरु होता. त्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात 497 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. परिणामी पाणीसाठा 9105 (42.35टक्के) झाला होता. त्यात वाढ होऊन सायंकाळी 14090 दलघफूवर (54.19) पोहचला. धरणात 6592 क्युसेकने आवक सुरू आहे. आज या धरणातील पाणीसाठा 55 टक्क्यांवर गेलेला असेल.

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पाऊस कोसळत असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल मंगळवारी सायंकाळी 9247 दलघफू (83.77) कायम ठेऊन 6087 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. हा विसर्ग आणि कृष्णवंती व अन्य ओढे-नाल्यांचे पाणी निळवंडेत जमा होत असल्याने या धरणातील पाणीसाठा आज आज 50 टक्क्यांवर पोहोचेल.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 456 तर निळवंडेत 362 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. पाण्याची आवक होत असल्याने नियमानुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी येणारे पाणी खाली प्रवरा नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी 10 वाजल्यापासून विसर्ग सोडण्यात येत आहे. काल सकाळी विसर्ग 5515 होता. पण दुपारनंतर काहीसा पाऊस वाढल्याने सायंकाळी तो 6087 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता.

भंडारदरातील विसर्ग व वाकी तलावातून सोडण्यात येणारा 789 क्युसेक विसर्ग आणि अन्य पाणी दाखल होत असल्याने काल सकाळी निळवंडेतील पाणीसाठा 3732 दलघफू (44.69 टक्के) होता. तो सायंकाळी 3934 दलघफू (47.24टक्के ) टक्क्यांवर पोहचला. आज सकाळपर्यंत या धरणातील पाणीसाठा 4000 दलघफूच्या पुढे सरकणार आहे.

Web Title: Mula Dam So per cent, the discharge from Bhandardara dam is increased

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here