मृत्यूनंतरही सोडली नाही साथ, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही संपविले जीवन
Nagpur: प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या प्रियकरानेही आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर: प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या प्रियकरानेही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
जीम ट्रेनर आकाश (२३, वाठो़डा) असे मृताचे नाव आहे. आकाशच्या प्रेयसीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो नैराश्यात गेला होता. १६ जुलै रोजी त्याने घरी विषारी गोळ्या घेतल्या. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आईवडील आणि भाऊ आहे. या घटनेमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Web Title: after the suicide of the beloved, the lover also ended his life
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App