Home क्राईम खासगी सावकाराने पती समोरच पत्नीवर केला बलात्कार, खळबळजनक कृत्य

खासगी सावकाराने पती समोरच पत्नीवर केला बलात्कार, खळबळजनक कृत्य

Pune Crime: उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खासगी सावकाराने त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार (Raped) केल्याची घटना.

private lender raped his wife in front of her husband

पुणे: उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खासगी सावकाराने त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.  इतकच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून हा व्हिडिओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला. पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली. याबाबत एका 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47) याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.

या संपूर्ण घटनेचा आरोपीने मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील तयार केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: private lender raped his wife in front of her husband

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here