अमृतसागर दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम पुन्हा जाहीर- Election
Akole Election: अमृतसागर दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम पुन्हा जाहीर, बिनविरोधची चर्चा फोल
अकोले: उच्च न्यायालयाच्या दूध संघासंदर्भातील आदेशानंतर अमृतसागर दूध संघाची निवडणूक निश्चित झाली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्नही फोल ठरले आहेत. आता या निवडणुकीत आमदार किरण लहामटे व अगस्ति साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर हे महाविकास आघाडीकडून शेतकरी समृद्धी मंडळाचे तर भाजपकडून अमृतसागर दूध संघाचे हंगामी अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड व उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे हे शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व करीत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर मंगळवारी अमृतसागर दूध संघ निवडणुकसंबंधी दाखल आव्हान याचिकेवरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत निवडणूक तत्काळ घेण्याचे आदेशित केले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदनगर येथील सहकारी दुग्धसंस्था विभागाचे सहायक निबंधक दिपक पराये यांनी ज्या दिनांकापासून निवडणूक कार्यक्रम रद्द केला होता तेथून तो पुन्हा घेण्याचे आदेश पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एस. खंडागळे यांनी १६ डिसेंबरला दिले आहेत.
या आदेशानुसार नामनिर्देशनपत्र माघार घेण्याची मुदत २१ ते २६ डिसेंबरपर्यंत असून २७ डिसेंबररोजी चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर ८ जानेवारीस सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होईल. मतमोजणी नंतर निकाल तत्काळ जाहिर करण्यात येणार आहे. एकूण ठरावानुसार फक्त १३० मतदार असून १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. थोडक्यात परस्परविरोधातील ३० उमेदवारांत ही सरळ लढत होण्याचे चिन्ह दिसत आहे.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
किमान ३० उमेदवारांना उमेदवार वगळून १०० मतदार मतदान करणार आहेत. निवडणुकीनंतर आजी व माजी आमदारांपैकी अमृतसागर दूध संघावर एकहाती सत्ता स्थापन करण्यात कोण बाजी मारेल, याकडे तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांसह राजकीय पदाधिकारी व कार्यकत्यांचे लक्ष लागले आहे.
Web Title: Election program of Amritsagar Dudh Sangh Akole announced
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App