जेईई मेन्स जानेवारीत; नीट ७ मे रोजी, नोंदणी सुरू
JEE Exam And NEET Exam Date Declared: केंद्रीय प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.
पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठीच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार जानेवारी आणि एप्रिलमध्ये संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स), वैद्यकीय प्रवेशांसाठीची नीट परीक्षा ७ मे, विद्यापीठ प्रवेशांसाठीची केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) २१ ते २३ मे रोजी होणार आहे.
एनटीएने नोंदणीची आणि परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. एनटीएतर्फे विविध प्रवेश परीक्षांची प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर राबवली जाते. गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक कामकाजावरही झाला होता. एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक आता पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे. जेईई मेन्सच्या पहिल्या सत्राची परीक्षा २४, २५, २७, २८, २९
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
नोंदणी सुरू…
परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर एनटीएने जेईई मेन्स या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू केली. अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत १२ जानेवारी आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. एकूण तेरा भारतीय भाषांमध्ये आणि ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल.
Web Title: JEE Exam And NEET Exam Date Declared
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App