Home अहमदनगर Ahmednagar Suicide: महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Suicide: महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar, Shrirampur Suicide:  माहेरहून २५ हजार रुपये घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ, या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या.

Ahmednagar Woman commits suicide by hanging herself

श्रीरामपूर: विवाहितेस दारूच्या नशेत मारहाण करून माहेरहून २५ हजार रुपये आणण्यासाठी सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून प्रियंका सतीश पवार (वय २२, रा. उक्कलगाव) हिने आत्महत्या केली असल्याची फिर्याद मंगल शाहू गायकवाड (रा. रमानगर दत्तनगर) हिने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

मंगल गायकवाड हिने दिलेल्या फिर्यादीत प्रियंका सतीश पवार ही माझी नात असून, तिचा पती सतीष बापू पवार हा नेहमी दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करून माहेरहून २५ हजार रुपये घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या छळाला कंटाळून १४ डिसेंबरला तिने गळफास लावला होता.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

तिला उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना १६ डिसेंबरला तिची प्राणज्योत मालवली, असे म्हटले आहे. याबाबत सतीश बापू पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Woman commits suicide by hanging herself

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here