Home अहमदनगर अहमदनगर: विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

अहमदनगर: विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

Ahmednagar, Shrirampur Suicide Case: तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना. रात्रीच्या वेळी घडली घटना. मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आल्याने घटना उघडकीस.

Suicide Case young man's body was found in a well

श्रीरामपूर:  श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील शाळेपासून काही अंतरावर ताके वस्तीशेजारी अण्णासाहेब गवारे यांच्या शेतातील गट नं. 232 मधील विहिरीमध्ये येथील तरुणाने रात्रीच्या वेळी उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

काल सकाळी काही ग्रामस्थांना विहिरीवर कपडे आढळून आल्याने विहिरीत डोकावून पाहिले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead body) तरंगत असल्याचे आढळून आले. यावेळी नागरिकांनी शेतमालक आण्णासाहेब गवारे यांना घटनेची माहिती दिली. श्री. गवारे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी कळविले. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण पवार, शरद अहिरे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे हलविला.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

सदरचा मृतदेह येथील सुनील नामदेव मोरे (वय 37) या तरुणाचा असल्याची माहिती मिळाली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. शोकाकुल परिस्थितीत त्याच्यावर शिरसगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Suicide Case young man’s body was found in a well

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here