संगमनेर 37 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, या ग्रामपंचायतील गालबोट
Sangamner Gram Panchayat Election: संगमनेर तालुक्यात ३७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान. तालुक्यातील मालुंजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला गालबोट लागले आहे राजकीय वाद १३ जणांवर गुन्हे दाखल, या गावात अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात.
संगमनेर: तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज मतदान (Election) होत आहे. या पार्श्वभूमीवर काल दुपारी संगमनेरच्या क्रीडा संकुलमध्ये मतदान यंत्रे व कर्मचारी पोलीस बंदोबस्तामध्ये गावोगावी रवाना करण्यात आले आहेत. केंद्रावरील एकूण कर्मचारी 790 यांच्यासह सुमारे 400 हुन अधिक पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.
37 ग्रामपंचायतीपैकी 2 सरपंच बिनविरोध झाले असून त्यामध्ये सायखिंडी व डोळासणे यांचा समावेश आहे. तर एकूण 367 पैकी 73 सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरीत जागेसाठी आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राजकीयदृष्ट्या ज्या संवेदनशील ग्रामपंचायती आहेत त्यांच्यासाठी अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घुलेवाडी, जोर्वे, निमोण, अंभोरे, मालुंजे, निमगावजाळी या ग्रामपंचायतींकडे खर्या अर्थाने लक्ष असणार आहे. मतदान यंत्रे सीयू 158, बीयू 209 अशी मतदान केंद्राध्यक्षांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. एकूण मतदान केंद्र 158, केंद्रावरील कर्मचारी एकूण 790, मतदान केंद्राध्यक्ष 158, मतदान अधिकारी 1 व 2 -316, मतदान अधिकारी क्रमांक (महिला)158, शिपाई 158, पोलीस कर्मचारी 158, राखीव मतदान अधिकारी कर्मचारी 80 या प्रमाणे कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणी दि. 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, संगमनेर येथे होणार आहे.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
दरम्यान संगमनेर तालुक्यातील मालुंजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला गालबोट लागले आहे. या प्रकरणी गावचे माजी सरपंच संदीप घुगे, प्रदीप घुगे यासंह अन्य दोघांवर अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने या गावात अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या राजकीय वादातूनच या ठिकाणी शिवीगाळ झाल्याची घटना घडली आहे. गावातील नागरीक आणि उमेदवारांनी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे.
Web Title: Sangamner Gram Panchayat Election
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App