Home अकोले अकोले: आईला मारहाण करतो म्हणून केला बापाचा खून, कोयत्याने केले वार

अकोले: आईला मारहाण करतो म्हणून केला बापाचा खून, कोयत्याने केले वार

Ahmednagar, Akole Murder Case: आईला मारहाण करतो म्हणून केला बापाचा खून कोयत्याने केले वार: दोरीने आवळला गळा; आईनेच दिली फिर्याद.

Murder his father for beating his mother, stabbed him with a coyote

राजूर: आपला बाप कायम दारू पिऊन आईला मारहाण करीत शिवीगाळ करतो, याचा राग आल्याने मुलानेच बापावर कोयत्याने वार केले. तसेच झोपवले, पांघरूण टाकले चुलत्याच्या मदतीने दोरीने गळा आवळून बापाचा खून केल्याची खळबळजनक घटना अकोले तालुक्यातील उडदावणे येथे शुक्रवारी (दि. १६) रात्री नऊच्या सुमारास घडली. याबाबत आरोपी मुलाच्या आईनेच राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुनील सोमा गिन्हे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. या घटनेची फिर्याद मृताची पत्नी व आरोपीची आई गंगूबाई सुनील गिन्हे (वय ३७) यांनी दिली. त्यानंतर काही तासांत सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी सुरेश सुनील गिहे व मृताचा भाऊ एकनाथ सोमा गिहे या दोघांना अटक केली. केली.

मृत सुनील सोमा गिन्हे हा गेल्या अनेक दिवसांपासून दारू पिऊन घरी आला की पत्नी गंगूबाई यांना शिवीगाळ करत मारहाण करत होता. मुलगा सुरेश याला हा प्रकार सहन होत नव्हता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे मयत सुनील हा शेंडी येथून दारू पिऊन मटण घेऊन आला होता. बाहेर जाऊन येतो असे सांगितल्यानंतर गंगूबाई त्यांची वाट पाहत होत्या. घरात येताच पत्नीला नेहमीप्रमाणे शिवीगाळ व मारहाण सुरू केली.

त्यामुळे घरात आरडाओरड झाला. हा आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजारी असणारा मुलगा सुरेश आणि मृताचा भाऊ एकनाथ हे दोघे धावत आले. आईला कशाला मारता, अशी विचारणा मुलाने केली असता सुनील यांनी त्यालासुद्धा शिवीगाळ सुरू केली. या दोघांचे भांडण सोडवत असताना दीर मध्ये पडला; तर त्यालादेखील सुनीलने शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात

दररोज होणारा हा प्रकार मुलगा सुरेश याला सहन झाला नाही आणि रागाच्या भरात त्याने शेजारी असणारा कोयता उचलून बापाच्या पाठीवर वार केले. यानंतर मृत सुनील याचा भाऊ एकनाथ आणि सुरेश या दोघांनी दोरीने त्याचा गळा आवळला.

दुसऱ्या दिवशी शनिवार (दि. १७) पोलिस पाटील यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी राजूर पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक इंगळे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात आणला. गंगूबाई यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दाखल करत फरार झालेल्या आरोपींना केवळ चार तासांत अटक केली.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

सुनील गिहे यांच्यावर मुलगा सुरेश याने सपासप वार केले. तसेच सुरेश मृताचा भाऊ एकनाथ हे सुनील यांचा दोरीने गळा आवळत असताना आई गंगूबाई दोघांना प्रतिकार करीत होत्या. सुनील यांचा जीव गेल्यानंतर सुरेश व एकनाथ या दोघांनी सुनील यांचा मृतदेह खाटेवर झोपवला. तसेच त्याच्यावर पांघरूण टाकून ते पसार झाले. सकाळपर्यंत हा मृतदेह तसाच वाटेवर झोपवलेल्या अवस्थेत होता, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Murder his father for beating his mother, stabbed him with a coyote

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here