Home क्राईम संगमनेरात बनावट दारू कारखाना उद्धवस्त, दोघांना अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेरात बनावट दारू कारखाना उद्धवस्त, दोघांना अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangamner News: एका बनावट दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून कारखाना उद्धवस्त केल्याची कारवाई. (Fake liquor factory busted in Sangamner)

Fake liquor factory busted in Sangamner, two arrested

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे एका बनावट दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून कारखाना उद्धवस्त केल्याची कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा व दमण राज्यातून आणलेले तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य महाराष्ट्र राज्याच्या लेबल असलेल्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरणार्‍या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत गोवा आणि दमणच्या दारूच्या पॅक बाटल्या तसेच एक हुंडाई कंपनीचे वाहन असा एकूण 14 लाख 28 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सुरेश मनोज कुमार कालडा (रा. जाणता राजा मैदानाजवळ, संगमनेर), चैतन्य सुभाष मंडलिक (रा. रायतेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभागीय आयुक्त अनिल चासकर, व अहमदनगरचे अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई संगमनेर विभागाचे निरीक्षक आर. डी. वाजे, दुय्यम निरीक्षक व्ही. जी. सूर्यवंशी, एम. डी. कोंडे, सहा. दुय्यम निरीक्षक एस. आर. वाघ, जवान एच. डी. गुंजाळ, श्रीमती एस. आर. वराट, निरीक्षक अनिल पाटील, जमादार बी. ई. भोर यांनी ही कारवाई केली.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन देशात जल्लोषात साजरा होत असताना राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या पथकाने रविवारी रात्री नाशि-पुणे महामार्गावर रायतेवाडी शिवारात ही कारवाई केली.

रायतेवाडी शिवारात एका धाब्याचे मागे शेतामध्ये असलेल्या एका घरामध्ये गोवा व दमण राज्यातून आणलेले तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य महाराष्ट्र राज्याच्या लेबल असलेल्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरले जात होते. तसेच या बाटल्यांवर नामांकित कंपन्यांची बुचे बसवली जात होती.

उत्पादन शुल्काच्या पथकाने महाराष्ट्रातील बाटल्यांवर लावण्यासाठी आणलेले विविध ब्रँडचे बनावट नकली बुचे व गोवा आणि दमणच्या दारूच्या पॅक बाटल्या तसेच एक हुंडाई कंपनीचे वाहन क्रमांक एम. एच. 17 सीएम 4268 असा एकूण 14 लाख 28 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Web Title: Fake liquor factory busted in Sangamner, two arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here