Home क्राईम Rape Case: बॉलीवूडच्या या गायक संगीतकार याच्यावर बलात्काराचा गुन्हा

Rape Case: बॉलीवूडच्या या गायक संगीतकार याच्यावर बलात्काराचा गुन्हा

Rape Case: ३० वर्षीय कॉस्च्युम डिजायनरने राहुल जैनवर बलात्काराचा आरोप.

Rape Case Bollywood singer-composer Rahul Jain

मुंबई: बॉलीवूड गायक संगीतकार राहुल जैनवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील एका ३० वर्षीय कॉस्च्युम डिजायनरने राहुल जैनवर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा गायक राहुल जैन यांनी केला आहे.

पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल जैन यांनी तिच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने तिच्या कामाचं कौतुकही केलं. महिलेला त्याचा वैयक्तिक कॉस्च्युम डिजायनार म्हणून नियुक्त केले जाईल असे आश्वासन देऊन उपनगरातील अंधेरीतील उंच त्याच्या फ्लॅटवर भेटायला सांगितले.

महिला ११ ऑगस्ट रोजी जैन यांना त्यांच्या फ्लॅटमध्ये भेटायला गेली. त्यावेळी राहुल यांनी आपल्याला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेत बलात्कार केला. असा आरोप पीडित महिलेनं केलं आहे. इतकंच नाही तर, विरोध केला असता जैन यांनी आपल्याला मारहाण तसेच पुरावे नष्ट करण्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

दुसरीकडे राहुल जैन यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. महिलेनं केलेले आरोप खोटे असून आपण सदरील महिलेला ओळखत नसल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

Web Title: Rape Case Bollywood singer-composer Rahul Jain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here