बनावट लग्न लावून देणारी टोळी लोणी पोलिसांनी केली जेरबंद
Breaking News | Ahmednagar: नवरी मुलगी व कोपरगावच्या मध्यस्तीसह चौघांना अटक(Arrested).
राहता: बनावट लग लावून देऊन वर पित्याकडून ३ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक करणारी टोळी लोणी पोलिसांनी जेरबंद केली, याप्रकरणी नवरीसह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांना शनिवारी राहाता येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
वधू मुलीचे लग्न झालेले असताना ती नवरी आहे असे भासवून ३० नोव्हेंबर २०२३ रोजी बनाबट लग्न लावून देऊन भगवतीपुर येथील एका कुटुंबाची फसवणूक करण्यात आली होती. यासंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. यात आरोपी रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण, रोहिणी कैलास गायकवाड, दिपिका प्रवीण कांबळे सर्व रा. बदलापूर बेलवली, ता. अमरनाथ, जि. ठाणे, पुंडलिक उर्फ सतीश चांगदेव शिंदे रा. तिळवणी, ता. कोपरगाव यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांसमवेत अनिता संतोष चंदनशिवे, संतोष फकीरा चंदनशिवे, रामलाल राठोड, संगीता घुले सर्व रा. छत्रपती संभाजीनगर यांनी संगनमत करून मुलगा मयुर दशरथ गायकवाड यांच्याशी लग्राचा बनाव केला. लग्न लावण्यासाठी ३ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
सदर गुन्ह्याचा तपास करताना लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, हेड कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण, पोलीस नाईक रवींद्र मेटे, गणेश आडांगळे, मच्छिंद्र इंगळे, महिला पोलीस जयश्री सातपुते, मनिषा गिरी या तपास पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करताना गुप्त बातमीदाराकडून माहिती घेत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता हे कारस्थान उघडकीस आले.
लोणी पोलीस ठाण्यात २३ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी चौकशी केली असता हा संपूर्ण बनाव झाल्याचे उघड झाले. नवरी पूर्वीचीच विवाहित असून तिला चार वर्षांचा मूलमा आहे. यातील मध्यस्थी असलेल्या कोपरगाव येथील पुंडलिक उर्फ सतीश शिंदे याच्यावर यापूर्वी अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे असून हा त्याचा तिसरा गुन्हा आहे. या लझात शिंदे याने मध्यस्थी केली होती. त्या बदल्यात २६ हजार रुपये घेतले सदर गुन्ह्यात पोलिसांनी २६ हजार रुपये जप्त केले असल्याची माहिती सपोनि युवराज आठरे यांनी दिली.
Web Title: fake marriage gang was arrested by Loni police
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News