Home अकोले ब्रेकिंग न्यूज: राजूर हद्दीत काट्या- कुपट्यात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

ब्रेकिंग न्यूज: राजूर हद्दीत काट्या- कुपट्यात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Breaking News:  काट्या- कुपट्यात आढळून आलेल्या या मृतदेहामुळे परिसरात खळबळ.

Dead body of a young woman was found in Katya-Kupta

राजूर: अकोले तालुक्यातील राजुर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या गांजावणे परिसरात एका २९ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे. काट्या- कुपट्यात आढळून आलेल्या या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राजूर पोलीस ठाण्यात दि. २६/१२/२०२३ रोजी एक तरूणी बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल होती. या तरूणीचा शोध सुरू असतांना गांजावणे शिवारात द्रौपदा किसन भांगरे (वय २९) या बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या तरूणीने विषारी औषध सेवन करून आपली जीवन यांत्रा संपविल्याचे पोलीस व तीच्या नातेवाईकांनी म्हंटले आहे. दरम्यान मृत्यूपुर्वी तीने आपल्या व्हॉटस्अॅप स्टेटसवर काहीतरी टाकले होते. याचीही जोरदार चर्चा होत आहे. काल शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास सापडलेला हा मृतदेह ताब्यात घेत पोलीसांनी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास राजूर पोलीस करत आहे.

Web Title: Dead body of a young woman was found in Katya-Kupta

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here