Home महाराष्ट्र झोपेतच असताना कोयत्याने वार करून तरुणाचा खून – Breaking News Murder

झोपेतच असताना कोयत्याने वार करून तरुणाचा खून – Breaking News Murder

Breaking News: एका युवकाचा झोपेत असताना डोक्यात व गळ्यावर वार करून अत्यंत निर्दयीपणे खून (Murder) केल्याची घटना.

young man was Murder by a coyote while he was sleeping

औसा | लातूर: तालुक्यातील भादा पोलिस ठाणे हद्दीतील वडजी गावातील एका युवकाचा झोपेत असताना डोक्यात व गळ्यावर वार करून अत्यंत निर्दयीपणे खून केल्याची घटना शनिवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेबाबत पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

रणजित उर्फ बाळू तानाजी माळी (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरील युवक अविवाहित असून आई-वडीलांना शेती व्यवसायात मदत करून दुग्ध व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवार २९ रोजी नेहमीप्रमाणे रणजित हा वडजी शिवारातील आपल्या शेतात मुक्कामी गेला असताना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी अज्ञात मारेकऱ्यांनी झोपेत असताना त्याच्या डोक्यात व गळ्यावर अत्यंत निर्दयीपणे धारधार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस येताच याची माहिती भादा पोलिसांना देण्यात आली. सदरील घटनेची

माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगोले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे, व्यंकट कोव्हाळे, प्रकाश शिंदे आणि बिट अंमलदार राजेंद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला आणि शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह भादा आरोग्य केंद्रात पाठविला. सदरील खुनाची घटना शनिवार पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातील मारेकरी कोण, त्यांची संख्या किती आणि या मागचे कारण काय या प्रश्नांचे उत्तर पोलिस तपासात मिळणार असून संशयित म्हणून कांही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले मृतदेहावर असून मयताच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

Web Title: young man was Murder by a coyote while he was sleeping

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here