Home पुणे खळबळजनक! मुलीचा गळा दाबून बापाने घेतला गळफास

खळबळजनक! मुलीचा गळा दाबून बापाने घेतला गळफास

Breaking News | Pune Crime: आठ वर्षीय मुलीचा गळा दाबून बापाने गळफास घेतल्याची घटना.

father strangled the girl and hanged herself Suicide

पिंपरी (जि. पुणे) : आठ वर्षीय मुलीचा गळा दाबून बापाने गळफास घेतल्याची घटना थेरगाव येथे मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भाऊसाहेब भानुदास बेदरे (४३, मूळ रा. बेदरेवाडी, जि. बीड) आणि नंदिनी भाऊसाहेब बेदरे (८) अशी मृतांची नावे आहेत. बेदरे कुटुंब १५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने भाऊसाहेब चारचाकी वाहन चालवत होते.

भाऊसाहेब यांच्या पत्नी राजश्री (३२) गावाकडे गेल्या होत्या. मुलगी नंदिनी आणि मुलगा आशिष (१५) भाऊसाहेब यांच्यासोबत घरी होते. मंगळवारी पहाटे चारला पुण्यातील शिवाजीनगर येथे पोहोचल्यावर राजश्री यांनी भाऊसाहेब यांना फोन करून गाडी घेऊन येण्यास सांगितले. मात्र, ते आले नाहीत. त्यामुळे पाचच्या सुमारास त्या घरी पोहोचल्या.

त्यावेळी आशिषने दरवाजा उघडला. त्यावेळी नंदिनी झोपल्याचे दिसले. त्यांनी तिला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्याचवेळी पती भाऊसाहेब यांनी स्वयंपाक खोलीत गळफास घेतल्याचे दिसून आले.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी भाऊसाहेब यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. गावाकडची जागा विकली. मात्र, त्यातील काही रक्कम मिळालेली नाही, असे त्यात नमूद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Web Title: father strangled the girl and hanged herself Suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here