दोन महिन्यांपूर्वी लग्न, गुड न्यूजचा आनंदही हिरावला, महिला डॉक्टरचा मृत्यू, बस पुलावरून थेट नदीत
Breaking News | Amravati Accident: चालकाचं नियंत्रण सुटल्याने एक खासगी बस पुलावरुन थेट नदीपात्रात कोसळली.
अमरावती: अमरावती येथे चालकाचं नियंत्रण सुटल्याने एक खासगी बस पुलावरुन थेट नदीपात्रात कोसळली होती. या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला होता. तर २५ जण जखमी झाले होते. जखमींपैकी ८ जण अजूनही गंभीर असल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात डॉ. पल्लवी कदम यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून डॉ. पल्लवी या गर्भवती होत्या. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
डॉ. पल्लवी कदम यांचा ११ जुलैला विवाह झाला होता. अमरावती येथील एमआयडीसी येथे राहणाऱ्या राहुल इंगोले यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. तर, जेमतेम आठवड्याभरापूर्वी त्या गर्भवती असल्याचं त्यांना कळालं होतं. पल्लवी गर्भवती असल्याने कदम आणि इंगोले कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. पल्लवी देखील आई होणार असल्याने खूप खुश होत्या. पण, नियतीला त्यांचं सुख बघवलं नाही आणि साऱ्या आनंदावर दु:खाचे विरजण पांघरले.
डॉ. पल्लवी कदम या आपलं कर्तव्य बजावण्यासाठी खासगी बसने धारणीच्या दिशेने जात होते. तेव्हा धोक्याच्या वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट पुलावरुन नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात डॉ. पल्लवी यांचा मृत्यू झाला.
त्या गेल्या दोन वर्षांपासून मेळघाटातील चिचघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. लग्नानंतर त्या अणरावती येथे आल्या. त्या दररोज अमरावती ते चिचघाट अपडाऊन करतील, असं त्यांनी ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी खासगी बसची निवड केली. पण, त्यांचा हाच निर्णय चुकला अन नियतीने घात केला.
Web Title: Female doctor dies, bus falls directly into river from bridge
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study