अहमदनगर: घरात गुप्त कॅमेऱ्याने महिलेच्या खोलीचे चित्रीकरण
Ahmednagar News: ३७ वर्षीय महिलेच्या खोलीत आरोपीने एक गुप्त कॅमेरा लावून रूममधील सर्व चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद (Filming of a woman’s room ) केले. या घटनेबाबत विनयभंगाचा (Molested) गुन्हा दाखल.
राहुरी : एका ३७ वर्षीय महिलेच्या खोलीत आरोपीने एक गुप्त कॅमेरा लावून रूममधील सर्व चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद केले. या घटनेबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीने दि. २ एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान एका ३७ वर्षीय महिलेच्या खोलीतील कपाटावर एका बॉक्समध्ये एक गुप्त कॅमेरा ठेवला. महिला खोलीत काय करते, याचे सर्व चित्रीकरण त्या कॅमेऱ्यात कैद झाले. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर, तिने राहुरी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी अमजद हसन पठाण (रा. सडे ता. राहुरी) याच्यावर गुन्हा भादंवि कलम 354 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.
Web Title: Filming of a woman’s room with a hidden camera in the house
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App