Home संगमनेर संगमनेर: सीसीटीव्हीला चिखल लावून इंडियन ओवरसीज बँकेचे ‘एटीएम’ मशीन फोडण्याचा प्रयत्न

संगमनेर: सीसीटीव्हीला चिखल लावून इंडियन ओवरसीज बँकेचे ‘एटीएम’ मशीन फोडण्याचा प्रयत्न

Sangamner News:  तळेगाव दिघे येथील इंडियन ओवरसीज बँक शाखेचे ‘एटीएम’ मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा  (ATM Theft) चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना. चोरटे फरार होण्यात यशस्वी.

ATM Theft Attempt to break the 'ATM' machine of Indian Overseas Bank

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील इंडियन ओवरसीज बँक शाखेचे ‘एटीएम’ मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र पोलीस गाडी येत असल्याचे लक्षात येताच चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. गुरुवारी (दि. 6) पहाटे 4.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

तळेगाव दिघे येथे इंडियन ओवरसीज बँकेची शाखा असून सदर बँक शाखे नजीक एटीएम मशीन आहे. चोरट्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्न केला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार काही स्थानिक युवकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान गस्तीवर असलेली पोलीस पथकाची गाडी तातडीने तळेगाव येथे पाठविण्यात आली. मात्र पोलीस गाडीची चाहूल लागल्याने चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले.

यावेळी चोरट्यांनी एटीएमच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीला चिखल लावला होता. मात्र स्थानिक युवक व पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम फोडीचा प्रयत्न फसला. यापूर्वी चोरट्यांनी सदर इंडियन ओव्हरसीज बँक शाखेचे एटीएम फोडून मोठी रक्कम लंपास केली होती तसेच दोनदा टाटा इंडीकॉमचे एटीएम फोडून रक्कम लंपास केली होती. त्यानंतर चोरट्यांनी दुसर्‍यांदा इंडियन ओवरसीज बँक शाखेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस नाईक बाबा खेडकर सहित पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करीत माहिती घेतली. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळपर्यंत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता.

Web Title: ATM Theft Attempt to break the ‘ATM’ machine of Indian Overseas Bank

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here