Home क्राईम संगमनेर शहरात दोन किराणा दुकाने फोडली, पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास

संगमनेर शहरात दोन किराणा दुकाने फोडली, पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास

Sangamner Theft: संगमनेर शहरात गजबजलेल्या ठिकाणी दोन किराणा दुकानातून रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

Two grocery shops were theft in Sangamner city

संगमनेर: संगमनेर शहरात गजबजलेल्या ठिकाणी दोन किराणा दुकानातून रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर संगमनेर बस स्थानकाच्या समोरील काश्मीर हॉटेललगत असणारे राठी बंधूंचे दोन किराणा दुकाने अज्ञात चोरट्याने फोडत दुकानातील रोकड व इतर माल असा एकूण पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. संगमनेर शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर बसस्थानक आणि हॉटेल काश्मीर या गजबजलेल्या परिसरा मध्ये काश्मीर हॉटेल लगत राठी यांच्या मालकीची दोन किराणा दुकाने आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राठी हे सोमवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी सात वाजता दुकान उघडण्यास नेहमीप्रमाणे ते आले असता त्यांना, किराणा दुकानातील सिगारेटचा माल दिसला नाही तसेच गल्ल्यातील रोख रक्कमही दिसून आली नाही. त्यानंतर राठी यांनी वडील अशोक राठी यांना दुकानातील सिगारेट आणि रोख रकमेबद्दल विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

हॉटेल काश्मीर शेजारी पत्र्याच्या शेड मध्ये पल्लवी किराणा व गणेश किराणा दुकान आहे. शेजारी शेजारी असलेल्या दुकानच्या शेडची एक खिडकी नेहमी उघडी असते. त्यामुळे ही खिडकी उचकटून अज्ञात चोरट्याने दोघांच्या दुकानातील सुमारे 92 हजार रुपयांच्या सिगारेट, 36 हजार रुपयांची विलायची आणि दुकानच्या गल्ल्यातील 42 हजार 500 रुपयांची रोकड असा सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत तुषार अशोक राठी यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

Web Title: Two grocery shops were theft in Sangamner city

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here