संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत गाळ्यात धक्कादायक प्रकार उघडकीस, पोलिसांचा छापा
Sangamner Crime: ग्रामपंचायतच्या गाळ्यात संगणकावर फन टार्गेट या नावाने खेळल्या जाणार्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा (Raid), चौघे ताब्यात.
संगमनेर: तालुक्यातील साकुर येथे ग्रामपंचायतच्या गाळ्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतच्या गाळ्यात संगणकावर फन टार्गेट या नावाने खेळल्या जाणार्या जुगार अड्ड्यावर बुधवारी (दि.5) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घारगाव पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 23 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांना ताब्यात घेतले आहे.
घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना साकुर येथे एका शाळेसमोर असलेल्या ग्रामपंचायतच्या गाळ्यात संगणकावर फन टार्गेट नावाचा हार जितीचा जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक खेडकर यांसह पथकाने बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळताना प्रेम उमेश जगताप (वय 32, परळी वैजनाथ, बीड), नवनाथ सुरेश आवारे (वय 26, घोडेगाव, ता.जुन्नर, जि.पुणे), दत्तात्रय संजय कातोरे (वय 26, रा.जोगेपठार, ता.संगमनेर), यूवराज अशोक गायकवाड (वय 22, रा.साकुर, ता.संगमनेर) यांना ताब्यात घेतले. 20 हजार रुपये किमतीचे संगणक स्क्रीन, सी.पी,यु.,की.बोर्ड यांसह रोख रक्कम 3 हजार 220 रुपये असा एकूण 23 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Police raid a computer gambling den called Fun Target
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App