Home क्राईम घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय,  अल्पवयीन मुलीकडे यायचे गिऱ्हाईक, माजी महिला पोलीस कर्मचारी...

घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय,  अल्पवयीन मुलीकडे यायचे गिऱ्हाईक, माजी महिला पोलीस कर्मचारी गोत्यात

Hingoli Racket: अल्पवयीन मुलीस तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन देहविक्रीचा व्यवसाय (Prostitution Business) करण्यास प्रवृत्त करत असल्याची घटना.

Prostitution Business started in the house, buyers used to approach minor girls

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील श्रीनगर भागातील एका घरावर वसमत पोलिसांनी छापा मारला. तेथे एका अल्पवयीन मुलीस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून घरात वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेससह लोकांना ताब्यात घेऊन पॉक्सो व अन्य कलमेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

वसमत शहरातील श्रीनगर कॉलनीतील एका महिलेच्या घरी कुकर्म चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना लागली. वसमत शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा मारला. या छाप्यात एका अल्पवयीन मुलीस तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची घटना समोर आली.

एका अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म करण्यासाठी आलेला एक आरोपीही आढळून आला. सदर महिलेने आपल्या घरात कुकर्म करण्यासाठी जागा देऊन वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचेही या छाप्यात समोर आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून वैभव अवचित चौरे (रा. पिंपळा चौरे,तालुका वसमत) व श्रीनगर भागातील रहिवासी महिला अशा दोघांविरोधात पॉक्स आणि पीटा एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीनगर कॉलनी मध्ये एका अल्पवयीन मुलीला कुकर्म करण्यासाठी बोलावून व्यवसाय चालविला जात असताना गुन्हा दाखल झाला आहे. ज्यामध्ये आरोपींमध्ये एका माजी महिला पोलीस कर्मचारी यांचा समावेश असल्याने यामध्ये आणखीनच पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Prostitution Business started in the house, buyers used to approach minor girls

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here