Home अहमदनगर प्रेमप्रकरणातून मित्रानेच केला गोळीबार, यारगद्धार

प्रेमप्रकरणातून मित्रानेच केला गोळीबार, यारगद्धार

Firing by a friend out of love affair

भेंडा: नेवासा तालुक्यातील भेंडा येथील गोळीबार(Firing) हा बनाव असल्याचे तपासात उघड झाले आहे. फिर्यादीच्या मित्रांनीच हा बनाव केला असून यामधील १० जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. फिर्यादीचे एका मुलीबरोबर प्रेमसंबध होते. याच्या विरोधातूनच हा बनाव  प्रकार घडला आहे.  पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

भेंडा येथे शनिवारी रात्री व्होलीबॉल मैदानात सोमनाथ तांबे या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये तो जखमी झाला होता. फिर्यादीत दोन संशियीतांचा उल्लेख आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मुलीच्या प्रकरणातूनच सोमनाथ तांबे याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार तपासातून उघडकीस आला आहे.

या गुन्ह्यातील पाच आरोपी व गोळीबार प्रकरणातील गुन्हेगारांना आश्रय देणारे पाच असे १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबसाहेब बोधक, अमोल राजेंद्र शेजवळ यांनी खुनाचा प्रयत्न केला म्हणून तर ओंकार राजेंद्र काकडे, प्रसाद शिवाजी दळवी, अक्षय संजय आपशेट यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत व राहण्यास आश्रय दिल्याने व शुभम किशोर जोशी रा. शहरटाकळी ता. शेवगाव यास गावठी पिस्तुलासह अटक केली आहे.

फिर्यादी सोमनाथ तांबे याचे एका मुली मुलीबरोबर प्रेम होते. त्यास अक्षयचा विरोध असल्यामुळे अक्षयने तांबेवर गोळी झाडली असल्याचे पोलीस निरीक्षक करे यांनी सांगितले.

Web Title: Firing by a friend out of love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here