Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणाचा फज्जा, नागरिकांची डॉक्टरांना धक्काबुक्की

अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणाचा फज्जा, नागरिकांची डॉक्टरांना धक्काबुक्की

Vaccination fuss in Ahmednagar

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आठवडाभरापासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण (Vaccination) बंद झाले होते. जिल्ह्यात गुरुवारी लसीकरणास अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे. मात्र लसीकरणासाठी मोठी गर्दी झाल्याने लसीकरणाचा फज्जा उडाला आहे.

कोपरगावात लस घेण्यासाठी आलेल्या लोकांनी डॉक्टर व नर्सला धक्काबुकी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांनतर आम्हाला सुरक्षा मिळाली पाहिजे तरच लसीकरण सुरु ठेवणार असल्याचा पवित्रा आरोग्य सेवकांनी घेतला आहे.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना प्रथम लस देण्यात येणार होती. याचदरम्यान 45 वर्षांच्या वरील नागरिकांनीही दुसरा डोस घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. केवळ 300 जणांना आज लस देण्यात येणार असल्याने नागरिकांनी पहाटे पासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग नियम पायदळी तुडवण्यात आले. ही गर्दी नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांनाही धक्काबुक्की झाल्याचे माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सचिन जोशी यांनी दिली आहे. अखेर गर्दी नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांची मदत रुग्णालय प्रशासनाला घ्यावी लागली.

Web Title: Vaccination fuss in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here