सराईत चोरट्यास पोलिसांनी केले गजाआड
श्रीरामपूर | Shrirampur: सोनसाखळी चोरीतील सराईत गुन्हेगार बलराम उर्फ बल्ली यादव यास शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी जेरबंद केले आहे. त्याच्यावर सोन साखळी चोरीचे गुन्हे दाखल होते. नाशिक येथील अट्टल गुन्हेगार नईम शेख याचा तो साथीदार आहे.
त्याच्याकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे मिळून आली आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. आरोपी यादव यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे पिंपरी चिंचवड येथून चोरलेली ४० हजार रुपये किमतीची स्कूटर मिळून आली आहे. यादव हा शहरातील सरस्वती कॉलनीत राहतो. पोलीस त्याच्या बऱ्याच दिवसांपासून मागावर होते.
पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
Web Title: Shrirampur thief was caught by the police