Home अकोले Rajur: राजूरमध्ये आठ दिवसांचा जनता कर्फ्यू

Rajur: राजूरमध्ये आठ दिवसांचा जनता कर्फ्यू

Eight-day public curfew in Rajur

राजूर | Rajur: अकोले तालुक्यातील राजूर गावात कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राजूर ग्रामपंचायतीने गुरुवारपासून आठ दिवस म्हणजेच पुढील गुरुवारपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे अशी माहिती ग्रामपंचायत सरपंच गणपतराव देशमुख यांनी दिली आहे.

राजूर गावात या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहे. राजूर गावात परिसरातील इतर गावांचा नित्याचा संबंध येत असतो. मात्र मागील काही दिवसांपासून राजूर आणि परिसरात कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. ही साखळी तोडण्यासाठी व कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने सरपंच गणपत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन सरपंच गणपतराव देशमुख यांनी केले आहे. 

Web Title: Eight-day public curfew in Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here