Home अहमदनगर कोरोना आवरेना: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय संख्या

कोरोना आवरेना: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update Today 4139

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे तांडव अजूनही थांबायला तयार नाही. जिल्ह्यात एका महिन्यापासून लागू असलेल्या कडक लॉकडाऊनमधेही लोक घराबाहेर पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. बुधवारी बाधित रुग्णांचे सर्व विक्रम मोडीत काढले. गुरुवारी अवघ्या २४ तासांत ४१३९ बाधित आढळून आले आहे.

मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली त्यामुळे प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश पारित केले. घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक केले. पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये असेही आदेश काढण्यात आले. तसेच नियम मोडणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करणेही सुरु केले. परंतु तरीही नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा धाक बसत नसल्याने दंडाच्या रकमेत वाढ केली. तरीही सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्याचे प्रमाण अधिक होते. दुकानांमध्ये गर्दी होत असल्याने परिणामी ४ एप्रिल रोजी ब्रेक द चैन अंतर्गत पुन्हा कडक निर्बंध लागू झाले. सर्व आठवडे बाजार बंद करण्याचा आदेश पारित झाला. ३ एप्रिल पर्यत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले. ब्रेक ड चैन चे काटेकोर पालन होत नसल्याने जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला. १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला तरीही लोक अजूनही घराबाहेर पडतच आहे.

गेल्या २४ तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय खालीलप्रमाणे:

मनपा: ६७४

श्रीगोंदा: ४३६

नगर ग्रामीण: ३५९

पारनेर: ३३४

कोपरगाव: ३२१

राहता: २६४

राहुरी: २६३

संगमनेर: २१०

कर्जत: २०५

शेवगाव: २०५

नेवासा: २०१

पाथर्डी: १६४

अकोले: १४५

इतर जिल्हा: १३५

जामखेड: १०७

श्रीरामपूर: ६४

भिंगार: ४८

इतर राज्य: ३

मिलिटरी हॉस्पिटल: १

असे एकूण ४१३९ बाधित आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar Corona Update Today 4139

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here