Home क्राईम चारित्र्याच्या संशयावरून पाण्यात बुडवून मावशीनेच केला भाच्याचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पाण्यात बुडवून मावशीनेच केला भाच्याचा खून

Market yard aunt Murder her niece by drowning 

पुणे | Murder Case: येथील मार्केट यार्ड येथे मावशीनेच आपल्या ३ वर्षाच्या भाच्याचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी निर्मला कैलास वर्मा रा. मार्केट यार्ड या महिलेस अटक केली आहे.

चाकेन अवधेश वर्मा वय ३ असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. अवधेश धनीराम वर्मा वय २७ रा. मार्केट यार्ड यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, १ मे रोजी मार्केट यार्ड परिसरातील बांधकाम साईटवर ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. युनी इंडिया वास्तू कंपनीचे मार्केट यार्ड याठिकाणी बांधकाम सुरु आहे. १ मे रोजी इमारतीमध्ये ठेवलेल्या लिप्टसाठी ठेवलेल्या जागेतील पाण्यात एका ३ वर्षाच्या मुलाचा मृतदेह `आढळून आल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी सर्व बांधकाम मजूर असल्याने मुलगा खेळता खेळता गेला असावा व तो पाण्यात पडून त्याच्या मृत्यू झाला असावा असे प्राथमिक बाबीतून दिसून आलं होत.

याठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी लक्षात आले की, मुलाची एक चप्पल घटनेच्या ठिकाणी तर दुसरी लांब पडलेली आढळून आली. या गोष्टीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा निर्मला ही इमारतीवर जात असताना तिच्या मागोमाग चाकेन हा मुलगा जात असल्याचे दिसून आले. काही वेळाने ही बाहेर आली मात्र मुलगा बाहेर आला नाही. पोलिसांनी बांधकाम मजुरांकडे चौकशी केली असता फिर्यादीच्या घरच्यांच्या बाबतीत चारित्र्यावरून संशय घेत असतं त्यावरून त्यांच्यात भांडण होत असल्याची माहिती समोर आली.

त्यामुळे पोलिसांनी निर्मला हिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने आपण रागाच्या भरात चाकेन याला उचलून लिप्टच्या खड्यातील पाण्यात टाकून दिले असल्याची कबुली दिली. तिला पोलिसांनी अटक केली आहे. चप्पलेवरून हा खरा प्रकार उघडकीस आला आहे.  

Web Title: Market yard aunt Murder her niece by drowning 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here