इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
संगमनेर: समाजप्रबोधनकार व प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत पुन्हा भर पडणार आहे. नुकतीच अनिसने इंदोरीकर महाराजाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे.
प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना पुत्र प्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत संगमनेर सत्र न्यायालयाने दिलासा दिला होता. या कारवाईच्या फेऱ्यातून सुटका झाली असतानाचा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुत्र प्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी वक्तव्य केलं होत. याप्रकरणी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता. त्यावरून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आठ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्य सचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी माहिती दिली आहे.
Web Title: Indorikar Maharaj difficulty is likely to increase