Home संगमनेर संगमनेरात जमावाने केला पोलिसांवर हल्ला, तुफान दगडफेक

संगमनेरात जमावाने केला पोलिसांवर हल्ला, तुफान दगडफेक

Sangamner the mob attacked the police and hurled stones

संगमनेर | Sangamner: शहरात नागरिकांची गर्दी उसळल्याने ती गर्दी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. संगमनेर शहरातील तीन बत्ती येथे गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेतील सहा निष्पन्न आरोपीसह अज्ञात १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करण्यात आली. यावेळी जमावाने दगडफेक करून खासगी वाहनांचे नुकसान केले. या घटनेने शहरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस उप अधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी लवकरच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन बत्ती चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करणाऱ्या बऱ्याच लोकांनी मास्क घातले नव्हते. फिजिकल अंतर पाळले जात नव्हते. त्यामुळे गस्ती पथकातील राज्य राखीव दलाच्या जमावाने गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावातील काही नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. चौकातील लिंबाच्या झाडाखाली असलेला तंबूही उखडून रस्त्यावर फेकून दिला.या चौकात १०० ते १५० लोकांचा मोठा जमाव होता. हा जमाव पाहून पोलिसांनी तेथून पळ काढला, यावेळेस जामावाने खासगी वाहनांचे मोठे नुकसान केले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी तेथील सर्व कर्मचारी असे १० ते १५ जणांवर दंगलीच्या कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बहुतेकजण पसार झाले आहे.  

Web Title: Sangamner the mob attacked the police and hurled stones

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here