Home महाराष्ट्र Rape Case: आधी घरफोडी, मग दोघींवर बलात्कार, 22 वर्षीय तरुणाला अटक

Rape Case: आधी घरफोडी, मग दोघींवर बलात्कार, 22 वर्षीय तरुणाला अटक

First burglary, then rape, 22-year-old arrested

ठाणे | Thane Crime: 70 वर्ष पार केलेल्या दोन वृद्ध महिलांवर बलात्कार ( Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोनही वृद्ध महिला एकमेकींच्या शेजारी राहणाऱ्या आहेत. त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या बहाण्याने घरात घुसलेल्या चोराने दोघींवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये रविवारी हा प्रकार समोर आला. वाशिंद पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

70 आणि 72 वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.. लैंगिक अत्याचार प्रकरणी 22 वर्षीय भूषण हिंदोळे याला अटक केली आहे. तो शहापूरचाच रहिवासी आहे.

20 मार्च रोजी भूषणने 70 वर्षीय महिलेच्या घरात घरफोडी केली. त्याच वेळी त्याने तिच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर तो शेजाऱ्यांच्याही घरात घुसला. आणि तिथे 72 वर्षांच्या महिलेवरही त्याने लैंगिक अत्याचार (sexual abuse) केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. २३ मार्च ला गुन्हा दाखल करण्यात आला असून २५ मार्चला आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: First burglary, then rape, 22-year-old arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here