Home अहमदनगर Drowned:  अंघोळीला गेलेल्या तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

Drowned:  अंघोळीला गेलेल्या तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

Rahuri Pravara, a young man who went for a bath, drowned in a river 

Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील मालुंजा खुर्द येथे अंघोळ करण्यासाठी प्रवरा नदी पात्रात उतरलेले एका तरुणाचा बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी घडली. कैलास नानासाहेब चौधरी वय 41 वर्षे, रा. दरडगाव तर्फे, बेलापूर ता. राहुरी यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे.

कैलास चौधरी हे दि. 1 एप्रिल रोजी त्यांचे काम आवरल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास मालुंजा खुर्द येथील प्रवरा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यांना पोहता येत नव्हते. नदीपात्रात उतरल्यावर त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.

यावेळी त्या परिसरात असलेल्या काही महिलांनी त्यांना बुडताना पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील काही तरूणांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. कैलास चौधरी यांचा पाण्यात शोध घेऊन त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना उपचारा अगोदरच मयत घोषित केले.

राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून राहुरी पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास हवालदार अशोक शिंदे हे करीत आहेत.

Web Title: Rahuri Pravara, a young man who went for a bath, drowned in a river 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here