Home क्राईम संगमनेर: मुलीसह आईवर गुंडांचा हल्ला, १२ जणांवर गुन्हा

संगमनेर: मुलीसह आईवर गुंडांचा हल्ला, १२ जणांवर गुन्हा

Sangamner attack mother with daughter, crime against 12

Sangamner Crime | संगमनेर: लालतारा वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह तिच्या आईवर तब्बल १२ जणांनी हल्ला केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकोले नाक्यावरील ८ महिलांसह १२ जणांवर दंगल, मारहाण, विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील लालतारा वसाहतीमधील एक अल्पवयीन मुलगी गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या मोपेडवरून भाजी घेण्यासाठी आली होती. यावेळी अकोले नाक्यावरील परिघा सूर्यवंशी, मथुरा सूर्यवंशी, कावेरी सूर्यवंशी, साक्षी सूर्यवंशी, कोमल सूर्यवंशी, उजवला सूर्यवंशी, पूनम माळी, जया सूर्यवंशी, साई शरद सूर्यवंशी, पोलिसांच्या दप्तरी पसार असलेला आदित्य संपत सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी, अतुल सूर्यवंशी या १२ जणांनी १७ वर्षीय मुलीला अडविले आणि तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने घाबरलेल्या त्या मुलीने लगेच आपल्या आईला फोन करून सदर प्रकार सांगितला.

लालतारा वसाहतीमधून त्या मुलीची आई धावत अकोले नाक्यावर आली. त्यावेळी वरील १२ जणांनी मुलीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करीत असल्याचे आईला दिसले. त्या मुलीच्या आईने त्या गुंडांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्या मुलीच्या आईलाही शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच सदर मुलीला जमिनीवर पाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पिडीतेच्या आईने वरील १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  

Web Titile: Sangamner attack mother with daughter, crime against 12

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here