Home महाराष्ट्र मोठी बातमी: माजी मंत्री बच्चू कडू यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

मोठी बातमी: माजी मंत्री बच्चू कडू यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

Bachu Kadu: २०१८ साली एका आंदोलनादरम्यान आमदार बच्चू कडू यानी शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

Former minister Bachu Kadu remanded to 14 days of judicial custody

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांना गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २०१८ मध्ये एका आंदोलनादरम्यान सरकारी कामांत अडथळा आणल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले होते.

यावेळी बच्चू कडू यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने बच्चू कडू यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला .न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

२०१८ सालच्या एका राजकीय आंदोलनादरम्यान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Former Maharashtra minister and MLA Bachchu Kadu has been sent to judicial custody by Girgaon court in a case of obstructing a public servant during a political protest in 2018. He appeared before the court today after a non-bailable warrant was issued against him.

Web Title: Former minister Bachu Kadu remanded to 14 days of judicial custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here